प्रतिनिधि:संदीप ढाकुलकर
“रांजणगाव (पुणे) येथे M EPL कंपनी विरोधात नागरिकांचे आंदोलन,,
पंचतारांकित एमआयडीसी म्हणून नावलौकिक असलेल्या रांजणगाव एमआयडीसी मध्ये महाराष्ट्र एन्व्हायरो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अनेक वर्षापासून असून ही कंपनी केमिकल युक्त पाणी आजूबाजूच्या खेडेगावात असणाऱ्या ओढ्यात आणि नाल्यामध्ये सोडत असून या दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक प्रकारचे गंभीर आजार झाल्याचे समोर आले आहे तसेच या भागातील जमिनी या क्षारयुक्त फेसाळ पाण्यामुळे नापीक झाल्या आहे या कंपनी विरोधात नुकसान ग्रस्त भागातील ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलन केले आहे पण या आंदोलनाला न जुमानता ही कंपनी अजून चालू आहे. या विरोधात पंचक्रोशीतील नागरिकांनी एकत्र येत रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला या आंदोलनास विविध पक्षातील राजकीय पदाधिकारी तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. या आंदोलनाला संबोधित करताना माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर दादा पाचुंदकर यांनी आक्रमक भूमिका मांडत आपण आत्तापर्यंत केलेल्या आंदोलनाला प्रशासन कुठल्याही प्रकारची मदत कंपनी विरोधात करत नाही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना पाचुंदकर बोलले की आमच्या आंदोलनाला अधिक तीव्र होऊ देऊ नका आणि या कंपनीस दिलेले वाढीव क्षेत्र हे प्रशासनाने मंत्रालयात जाऊन तात्काळ रद्द करावे किंवा जर या गोष्टी प्रशासनाला जमत नसतील तर आम्ही आमच्या पद्धतीने कंपनीच्या दारावर जाऊन बसू आणि कंपनी बंद करू असा गर्भित इशारा यावेळेस दिला. या आंदोलनाला बहुसंख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी उपस्थित होते