घाटंजी तालुक्यातील कोची आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघात आता परिवर्तन दौरा पार पडला.
मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन ग्रामवासीयांशी संवाद साधत. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा झंझावात युवा नेते तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जितेंद्रभाऊ उर्फ बाळासाहेब मोघे यांनी चालू केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आर्णी – केळापूर विधानसभा मतदारसंघातील कोची या गावी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी गावच्या सरपंच निर्मलाताई पेंदोर, पंकजभाऊ अक्कलवार, वासुदेवजी जुमनाके, राजूभाऊ पेंदोर, अर्जुनभाऊ कुलसंगे, कृष्णाभाऊ अक्कलवार, अक्षयभाऊ अक्कलवार, गोमाजी मडावी, लक्ष्मणभाऊ उरवते, प्रकाशभाऊ कुडमते, बाळाभाऊ अक्कलवार, तर सोबतयावेळी सोबत मारोतराव पवार, अभिषेक पाटील ठाकरे ॲड विजय भुरे, रिजवान शेख,मधुकर घोडाम, अरविंद चौधरी, प्रदीप राठोड, सागर डंभारे, अक्षय पवार, बबलु राठोड,अरविंद जाधव यांचे सह गावातील सर्व महिला व पुरुष उपस्थित होते..