गोर गरीब जनतेसाठी सतत झटणाऱ्या व अन्याया विरुद्ध आक्रमक होत लोकांना न्याय मिळवून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व आर्णी नगर सुधार समिती च्या कार्याध्यक्ष रंजनाताई आडे यांची अखिल भारतीय बंजारा महिला समिती च्या सरचिटणीस पदावर नियुक्ती झाली असून. महीला कमिटी च्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ. पार्वती ताई फुलसिंग यांच्या अध्यक्षतेखाली रंजना आडे यांची नियुक्ती करण्यात आली. थोडसं जगण समाजासाठी या युक्ती नुसार आपण समाजासाठी कार्य करू असे आडे यांनी यावेळी मत व्यक्त केले. या निवडी ने रंजना आडे यांच्यावर अभिनंदनाचा चा वर्षाव होत आहे.
