परिवर्तन महा विकास आघाडी म्हणजे सरकारने महा विकास आघाडी च्या मतात फूट पडण्याचा केलेल्या प्रयत्नाचा एक भाग असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीकेली होती.यावर पलटवार करतांना प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार बच्चू भाऊ कडू म्हटले की लोकां मधून चार चार वेळा कसे निवडून येता येते ते पहिले पहा अभ्यास करा मग टीका करा खासदार संजय राऊत कुठलाही अभ्यास नसणारे शिवसेना उबाठा चे आकाशवाणी केंद्र आहे त्याना फक्त रोज सकाळी बडबड करण्यासाठी फक्त विषय लागतो…!
आम्ही त्यांच्या कडे लक्ष देत नाही पण परिवर्तन म्हाशक्ती २८८ जागा लढेल व सत्ता महा शक्ती ची येईल असेही त्यानी ठणकावून सांगितले.जागा वाटपाचा फार्मूला लवकरच ठरवू असेही ते म्हणाले.