स्वप्नील जाधव यांनी माळहिप्परगा येथील पवार कुटुंबीयांची घेतली सांत्वन पर भेट
जळकोट प्रतिनिधी:-विश्वनाथ शिंदे
माळहिप्परगा येथील तरुण शेतकरी तिरुपती बाबुराव पवार व त्यांचा मुलगा नामदेव तिरुपती पवार त्यांच्या बैलांना धुण्यासाठी तलावात घेऊन गेले असताना अचानक बैल खोल पाण्यात गेले. त्यांना बाहेर हाकलण्याच्या प्रयत्नात मुलगा नामदेव पवार पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्याचे प्रयत्न त्याच्या वडिलांनी केले पण त्यात त्यांचा पण पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ही बाब उदगीर जळकोट विधानसभेची इच्छुक उमेदवार स्वप्निल जाधव यांना कळताच आपल्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन पवार कुटुंबीयांची जाऊन भेट घेऊन धीर दिला.
यावेळी त्यांच्यासोबत
ऍड.पंडित जाधव, राम गवळी, दयानंद गायकवाड, इत्यादी कार्यकर्ते
उपस्थित होते.