कारंजा विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजाच्या मतांचे प्राबल्य आहे. म्हणून या मतदारसंघात यवतमाळ जिल्हा काँग्रेस चे मनमिळाऊ अभ्यासू शेतकरी चळवळीत काम करणारे युवा नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले याचे खांदे समर्थक व कॉंग्रेस पक्षाचे माजी यवतमाळ शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून लक्षवेधी कामगिरी करणारे युवा नेते देवानंद पवार हे कारंजा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात समस्या शोध दिंडी घेऊन जात आहेत यावेळी गावागावात त्यांचे उस्फुर्त स्वागत होत असून मतदार ग्रामस्थ आपल्या परिसरातील समस्या मांडत आहेत
या दिंडीत टाळ मृदुगां च्या सुरत दिंडी निघते यात स्थानिक पदाधिकारी शेतकरी युवक व सर्व जाती धर्माचे महिला पुरुष सहभागी होत आहेत.देवानंद पवार यांना येथून उमेदवारी जाहीर केली तर ते १००% विजयी होतील असा सूर काँग्रेस च्या कार्यकर्त्याचा आहे.