आर्णी शहराला उलटी पांढरी असे उपहासाने म्हणतात पण हे शहर धार्मिक एकतेचे देखील प्रतीक आहे.येथे सर्व धर्माचे सण उत्सव गुण्या गोविंदाने साजरे होतात.
सर्वच उत्सवात अन्नदान सेवेची मोठी परंपरा आर्णीला लाभली आहे त्यात बाबा कम्बलपोष दरगाह येथे यात्रेच्या सात आठ दिवस अविरत प्रसाद भोजन लंगर सेवा असते तर गणपती उत्सवात गारपीट नावाच्या मांडला कडून दहा दिवस अन्नदान सेवा सुरू असते.
दुर्गादेवी मंडळ देखील अन्नदान सेवा राबवतात त्यात शिवनेरी दुरगोस्तव मंडळ व आझाद दुरगोस्तव मंडळाचा समावेश आहे.