विधानसभा उपाध्यक्षनरहळी झिरळवळ आणि आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. मुख्यमंत्री एकत नसतील, तर प्लॅन बी तयार असल्याचं झिरवळ यांनी सांगितलं. सत्ताधारी आमदारांनीच असे आंदोलन केल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलेय.
मंत्रालयातील मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच बाहेर आदिवासी आमदारांचं आंदोलन सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अश्वासनानंतरही आदिवासी आमदारांचे आंदोलन सुरु आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरळी झिरवळ यांच्यासह आदिवासी आमदार आक्रमक झाले आहेत. संरक्षक जाळीवरुन बाहेर काढल्यानंतर आमदारांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन पुकारले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांनी आंदोलन पुकारले. त्यांना सध्या संरक्षक जाळीवरुन खाली उतरवण्यात आले. त्यांनी मंत्रालयात आंदोलन सुरु केलेल आहे. आदिवासी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर उडी मारली. आज सकाळपासून आदिवासी आमदारांनी मंत्रालयामध्ये आंदोलन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सकाळी या आमदारांनी अडवलं होतं. आदिवासी आरक्षणाअंतर्गत धनगरांना आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी आदिवासी समजाच्या आमदारांनी आंदोलन पुकारलेले आहे.
आजच्या आंदोलनात किरण लहामटे, हेमंत सावरा, काशीराम कोतकर यांचा समावेश आहे. आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात आले होते.