संत श्रेष्ठ तुकोबा बद्दल वादग्रस्त विधान केलेले पंडित ढिरेंद्र शास्त्री यांच्या कथावाचनाचा कार्यक्रम पुणे येथे भाजप चे पुणे येथील माजी महापौर मुरलीधर मोहळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.बागेश्वर बाबा म्हणून सुपरिचित असलेल्या पंडित धिरेंद्र शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी सात तुकाराम महाराजांच्या पत्नी त्याना दांडूने मारायच्या म्हणून तुकाराम महाराज देव देव करत असे बिनबुडाचे बेताल वक्तव्य केले होते यावरून राज्यातील वारकरी संप्रदाय दुखावल्या गेला होता.हे पाहून धिरेंद्र शास्त्री यांनी तेव्हा माफी देखील मागितली होती.आता त्या वादग्रस्त विधाना नंतर बागेश्वर महाराजांनी देहू येथे जाऊन संत तुकाम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले व पुन्हा एकदा माफी मागितली.अचानक तुकोबांच्या भक्तीचे धिरेंद्र शास्त्रींना उधाण असे आले याबाबत विविध चर्चा रंगत आहेत.विशेष म्हणजे बागेश्वर बाबांनी सनातन धर्माचा पुन्हा पुरस्कार करून घटनेत हिंदू राष्ट्र साठी संशोधन करा अशी अजब मागणी केली.आज पंढरपूर येथे कार्तिक एकादशी ची शासकीय पूजेसाठी जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र शास्त्री याचे दर्शन घेऊन सनतं धर्म म्हणजे आदी आणि अंत असून काहींना सनातन चा अर्थ कळलाच नाही असे फडवणीस म्हणाले.
पुण्यातील धिरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम म्हणजे आगामी पुणे लोकसभेची तयारी असल्याचा अंदाज आहे.
