तालुका स्तरावर खेळाडू घडावे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळाच्या संधी मिळावा म्हणून तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात साहजिक याचे आयोजन तालुका स्तरावर असते मात्र त्याच्या नियोजनाचे कासरे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया कडे रहातात.
भ्रस्ट कारभाराची सवय लागलेल्या सर्वच यंत्रणा आहेत मग क्रीडा विभाग वेगळे कसे राहील…
अयोजना च्या नावावर अमाप पैसा शासन देतो पण तो पैसा कागदोपत्री खर्च करण्याचा पायंडा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आहे.
आर्णी येथे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन येथील तहसिल कार्यालय आवारातील क्रीडा संकुल मध्ये केल्या गेले.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तालुक्यातील लोनबेहळ,महा ळूगी,लोणी,सावळी या केंद्रातील शाळेचे विद्यार्थी सहभागी होण्यासाठी आले त्यांना ११ वाजता बोलावले सुरवातीला कागदपत्रे ऑनलाइन केल्या गेले व नंतर ऑफ लाईन कागदोपत्र तपासण्यात आले.
प्रत्यक्षात खेळाला सुरवात ही दुपारी २, वाजता झाली उन्हात तपल्याने खेळासाठी असलेली चटई तापली होती गरम मॅट वर चिमुकल्या विद्यार्थ्यांना खेळावे लागले क्रीडा विभाग जणू काही चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवावर उठले असे चित्र दिसत आहे. ना बसण्याची व्यवस्था ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. अशी गैर व्यवस्था क्रीडा स्पर्धा मध्ये पहायला मिळत आहे.स्थानिक आमदार व तहसील यांनी या गंभीर बाबी कडे लक्ष देण्याची गरज आहे.