काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यात २७ भारतीय पर्यटक ठार झाले होते.
या हल्ल्याचा निषेध नोंदवून बिहार येथील येथील एका जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान ला खडसावले होते व दहशतवादी जमीन पूर्णपणे नष्ट करू असा इशारा देत कठोर कारवाई करण्याचा सूचक इशारा दिला होता.
आज मन की बात मधून देशाच्या नागरिकांशी संवाद साधतांना पंतप्रधान म्हणाले की मृतकांना न्याय दिला जाईल त्यासाठी संपूर्ण जगातून भारताला समर्थन मिळत असून जगाने पाक च्या त्या कृत्या चा निषेध नोंदवला असून जगाच्या पाठीवर पाकिस्तान ला उघडे व एकटे पडण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला.
म्यान मार मधील भूकंपात भारतीय सैन्य दलाने चांगली मदत केली व वैद्यकिय सुविधा देखील पुरवल्या त्याबद्दल मोदीजी यांनी सैन्य दल व वैद्यकीय चमू चे आभार मानले. यावेळी एका ७३ वर्षीय महिलेचे प्राण सैन्य दलाने वाचवल्याचेही ते यावेळी म्हणाले.