पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभाग उघड झाल्या नंतर भारताने पाकिस्थान ला दिलेला कठोर कारवाई चा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता तर धडक निर्णय घेत सिंधू जल करार स्थगित करण्याचा इशारा दिला शिवाय कश्मीर मधील दहशतवादी लोकांचे घरे जमीनदोस्त केले.
भारताच्या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तान चे रेल्वे मंत्र्यांनी भारताला युद्धाची धमकी आहे. आहे.
पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारतावर अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली. आम्ही शाहीन, गोरी आणि गझनवीसारखी १३० क्षेपणास्त्रे भारतासाठी ठेवली आहेत. जर भारताने सिंधू पाणी करार थांबवला तर आम्ही त्यांचा श्वास थांबवू. भारताने युद्धासाठी तयार राहिले पाहिजे असें ते म्हणाले.
पाकिस्तानची अण्वस्त्रे केवळ सजावटीसाठी ठेवली नाही. आम्ही देशभरात अनेक ठिकाणी अण्वस्त्रे लपवून ठेवली असल्याचे अब्बासी यांनी म्हटले आहे.ज्याची माहिती भारतााला नाही असे अब्बासी म्हणाले.