पाकिस्तान चे माजी पंतप्रधान इम्रान खान हा तुरुंगात असून सुखरूप असल्याचे पाकिस्तान च्या ओब्सेर्व्हर ने म्हंटले आहे.
भारत पाकिस्तान तनावाच्या पार्श्वभूमीवर खूप खोट्या बातम्या पसरविण्याचे काम झाले त्यात पाकिस्तान च्या कडून जाणून बुजून हे काम करण्यात आले. भारतात देखील काही वृत्त वाहिन्याने चुकीच्या पद्धतीने बातम्या दाखवल्याने संरक्षण खात्याने नाराजी व्यक्त केली होती.
कल सोशिअल मीडियातून पाकिस्तान चे माजी पंतप्रधान इम्रान खान याचा तुरुंगात मृत्यू झाल्याचे पत्र व्हायरल झाले होते.पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार असलेला इम्रान खान एक चांगला अष्टपैलू खेळाडू होता इन स्विंग व ऑफ स्विंग गोलंदाजी व सोबत आक्रमक फलंदाजी ही त्याची विशेषतः होती.भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर याचेही त्याची मैत्री घट्ट होती असे मानले जाते त्याच्या शपथविधीला नवज्योत सिद्धू गेल्याने त्यावर टीका झाली होती.
मात्र त्याच इम्रान खान ने राजकारणात प्रवेश केला व स्वतःचा पक्ष काढला पण सुरवातीला त्याला यश आले नाही मात्र मतेर त्याला विजय मिळाला व तो पंतप्रधान झाला गत निवडणुकीत त्याच्या पक्षाचा पराभव झाला व नव्या सरकारने इम्रान ला तुरुंगात टाकले.