7k Network

अमरावती जिल्ह्यातील पहिल्या वाळू डेपो चे आ.प्रताप अडसड यांच्या हस्ते उद्घाटन

धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील जळगाव मंगरुळ येथे अमरावती जिल्ह्यातील पहिल्या वाळू डेपोचे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अरुणभाऊ अडसड यांच्या हस्ते मोठ्या थाटात उदघाटनं झाले.
यां वाळू डेपो मध्ये आता नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होऊन ठरवून दिलेल्या शासकीय दरात रेती उपलब्ध होईल तसेच घरकुल धारकांना ५ ब्रास मोफत रेती मिळेल आणि विशेष म्हणजेच त्यांना फक्त रेती वाहतुकीचा खर्च करावयाचा आहे.
यामुळे सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न स्वस्त वाळू उपलब्ध झाल्यामुळे पूर्ण होणार आहे.सामान्य जनतेला वाळू उपलब्ध करून देण्याकरिता प्रतापदादांनी सतत यां डेपोचा पाठपुरावा करून,अमरावती जिल्ह्यामध्ये फक्त धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये हा प्रकल्प सुरु करवून घेतला.
रेती वाहतुकीचे दर हे किलोमीटर नुसार निर्धारीत केले आहे त्याच्या वर कुठलेही दर आकारता येणार नाही,म्हणून कुणीही ठरवलेल्या दरापेक्षा जादा रक्कम देऊ नये असे आवाहन प्रतापदादा अडसड यांनी यावेळी केले.
यां वाळू डेपोच्या उदघाटनाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार,महसूल मंत्री मा.राधाकृष्ण विखे पाटील हे ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून उपस्थित होते.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!