7k Network

सरकार विरोधात आता रान पेटवण्यासाठी तयार रहा,बच्चू भाऊ कडू यांचे कार्यकर्त्यांना आवाहन….!

हे सरकार कमिशन जेथे मिळते ते काम करते कर्जमाफी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते येथे कमिशन मिळत नाही.तीर्थ क्षेत्र महा मार्गाची मागणी नाही पण कमिशन मिळते म्हणून हा मार्ग करण्याचा घाट सरकार घालत आहे असा घणाघात प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्य मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी केला.

 

छत्रपती संभाजी नगर येथे प्रहार चा विभागीय मेळावा व संताजी धनाजी व कार्यकर्ता पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी अंगावर शहारे आणणारे भाषण केले.

परभणी येथे संतोष पवार या शेतकऱ्यांने आत्महत्या केली ही बातमी कळताच त्याच्या सात महिन्याचे बाळ पोटात असलेल्या गर्भवती पत्नी ने विष पिऊन आत्महत्या केली तीन जीव गेले पण साधा संताप नाही,निःशेष नाही राजकीय पक्ष सत्ता व पैसे यांच्यात अडकलेल्या अवस्थेत आहेत अशा स्थितीत प्रहार चा कार्यकर्ता जागा असला पाहिजे.आपण या व्यवस्थे विरुद्ध लढलो पाहिजे आता रान पेटवून टाकू असा इशारा यावेळी सरकार ला दिला.

 

जून महिन्यात निर्णायक आंदोलन करू मुख्यमंत्री फडवणीस च्या घराला चारही बाजूने घेरु आशा वेळी लढणारा कार्यकर्ता आंदोलनात आला पाहिजे.असेही यावेळी बच्चू भाऊ म्हणाले.

 

 

आजही आर्णी तालुक्यातील पारधी बेडा वर पाण्यासाठी १२ वर्षाच्या मुलीचा जीव जातो काय करते प्रशासन भाजप आमदारांच्या पी ए च्या पत्नीला पैसे भरल्या शिवाय उपचार मिळत नाही पैसे नाही तर शिक्षण नाही.

 

 

सव्वा लाखात घरकुल होते का असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.अहिल्या बाई होळकर यांनी मंदिराचे खोदकाम करताना पाणी लागले म्हणून मल्हार राव होलकर्यांना विहिरी बांधायला सांगितल्या तुमच्या डोक्यातील विचार महत्वाचा आहे असे बोलताना ते म्हणाले शाहिद भगतसिंग यांचे उपोषण त्यांनी सांगितले आणि आता निर्णायक लढाईला तयार रहा असे आवाहन केले.

 

 

यावेळी विभाग स्तरावर चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब शेळके पाटील यांना शहीद भगतसिंग आंदोलक विभागीय पुरस्कार देण्यात आला राम गाडेकर यांनाही पुरस्कार देण्यात आला.

 

यावेळी जरी मोजके पुरस्कार असले तरी आपण कर्जमाफी ची लढाई जिंकू तेव्हा सर्व प्रहार ला सन्मान जनतेने दिला पाहिजे हे मला पहायचे आहे असेही बच्चू भाऊ कडू म्हणाले.या मेळाव्यात छत्रपती संभाजी नगर विभागातील सर्वच जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!