मुंबई म्हणजे माया नगरी येथे एकवेळ जेवण्याची सोय नसणार्याचे नशीब पालतल्याच्या अनेक कहाण्या आहेत विषेशता म्हणजे चित्रपट सृष्टीत अनेक दिग्गज कलाकारांनी या माया नगरीत सुरवातीला प्रचंड संघर्ष केला आणि आज त्यांच्या जवळ नाव प्रसिद्धी व अमाप संपत्ती आहे.सोबत लोकप्रियता देखील त्यांना मिळालेली आहे.
कधी काळी गुजरात वरून मुंबईत येत रेल्वे स्टेशन वर केळी विकणारा पुढे धीरूभाई अंबानी होऊन त्याने मोठे उद्योगपती म्हणून नाव कमावले.
महा नायक बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांनीही सुरवातीच्या काळात संघर्ष अनुभवला.
क्षेत्र कुठलेही असो जिद्द चिकाटी ध्येयवेडेपणा आणि कठोर परिश्रम यातून माया नगरी मुंबई ने अनेकांना मोठे केले त्यांना नाव दिले देशच नव्हे तर जगाला या महा नगराची भुरळ आहे.
कधी काळी मुंबईत गँगवार होते टोळ्या होत्या खंडणी खुम असे प्रकार येथे घडत होते पण मुंबई पोलिसांनी त्यांचे कम्बरडे मोडले.एन्काऊंटर करून सळो की पळो करून सोडले ९० च्या दशका पासून येथे शांतता असली तरी दहशतवादी व आतंकवादी च्या निशाण्यावर हे शहर असते २६/११ चा हल्ला देश कधीच विसरू शकत नाही.
ही एव्हढी पार्श्वभूमी नमूद करण्याचे कारण असे की महा नायक अमिताभ चा बंगला पहाण्यासाठी पर्यटक येतात त्यांना कुतूहल वाटते.अमिताभ कधी कर्जात बुडाला होता.पण कोण बनेगा करोडपती ने पुन्हा त्याना सावरले.याच अमिताभ च्या घरा शेजारी एका फळविक्रेता च्या मुलाने आईस्क्रीम चे दुकान सुरू केले ते एव्हढे लोकप्रिय झाले की आज त्याचा व्यवसाय ३०० कोटी रुपयांच्या घरात पोहचला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या घराजवळ, हृतिक रोशन यांच्या घराजवळ देखील, एका आईस्क्रीम पार्लरने व्यवसाय सुरू केला होता, जो आज ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्तचा व्यवसाय करतो. या पार्लरची सुरुवात एका फळ विक्रेत्याच्या मुलाने केली होती. “नॅचुरल्स आईस्क्रीम” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पार्लरने आज एक मोठा ब्रँड म्हणून ओळख मिळवली आहे.
रघुनंदन श्रीनिवास कामत यांनी या व्यवसायाची सुरुवात केली, ज्याचे वडील फळ विक्रेता होते.
व्यवसाय:
आज हा व्यवसाय ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्तचा झाला आहे.
स्थळ:
या पार्लरचे पहिले आउटलेट अमिताभ बच्चन आणि हृतिक रोशन यांच्या घराजवळ सुरू करण्यात आले होते.
आजचा ब्रँड:
“नॅचुरल्स आईस्क्रीम” हा आज एक मोठा आणि लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँड आहे.