जपान हा लोकसंख्येच्या तुलनेत लहान देश परंतु जगात विकसित तंत्रज्ञान या देशाचा अव्वल नंबर लागतो.या देशातील हिरोशिमा, नागासाकी देशावर बॉम्ब हल्ला झाला होता.संपूर्ण शहरे बेचिराख झाले होते पण यातून ही फिनिक्स पक्षा प्रमाणे हा देश पुन्हा उभा राहिला.मात्र आता एका नव्या भीतीने या देशातील नागरिकांची झोप उडाली आहे.
जपानविषयी सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. या देशात सर्वकाही ठीक आहे, असे नाही. एका भाकीताने जपानचीच नाही तर जगाची झोप उडवली आहे. त्यातच १४ दिवसात ९०० वेळा येथे भूकंपाचे झटके बसले आहे. काय होणार पुढे?
जपानमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये 900 हून अधिक वेळा भूकंप आला आहे. या पूर्व आशिया देशात सध्या खळबळ उडाली आहे. त्यातच जपानमध्ये महाप्रलय, त्सुनामी होईल अशी भीती काही भविष्यवेत्त्यांच्या भविष्यवाणींमुळे पसरली आहे. अनेक पर्यटकांनी जपानचे विमान तिकीट रद्द केले आहे. अनेकांनी हॉटेल्सचे बुकिंग रद्द केले आहे. त्यात या भूकंपाने भीतीची भर घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील नागरिकांच्या डोळ्याला डोळा नाही. ते जागरण करत आहेत.