7k Network

अजब सावकारी अक्षय कुमार ने घेतले १५% व्याज…!

बँका तुमच्या ठेवींवर तुम्हाला ठराविक व्याज देतात व कर्ज घेतल्यास मर्यादेत व्याजदर आकारतात पण काही खासगी लोक व्याजाने रक्कम देऊन अवाच्या सव्वा व्यज घेतात

परवाना नसतांना व्याजाणे रक्कम देता येत नाही.तसे केल्यास अवैध सावकारी चा गुन्हा नोंद होऊ शकतो.आता चित्रपट सृष्टीत देखील व्याज आकारण्या चा प्रकार घडला असून सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याने बाबू भैय्या म्हणजेच परेश रावल याच्या कडून १५% व्याजासह रक्कम वसूल केली आहे.

अक्षय कुमार ला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचे ट्विट चर्चेत (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच काहीना काही कारणांनी चर्चेत आहे. चित्रपटातील बाबू भैय्या म्हणजेच अभिनेते परेश रावल यांनी एक्झिट घेतल्याची घोषणा केल्यापासूनच या चर्चा अधिक वाढल्या आहेत. परेश रावल यांच्या एक्झिटच्या घोषणेनंतर अक्षय कुमारच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ कंपनीद्वारे त्यांना २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचे वृत्त आले. त्यानंतर शनिवारी (२४ मे) असं वृत्त आलं की, परेश यांनी ही रक्कम अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊसला १५ टक्के व्याजासह परत केली आहे.

‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, या चित्रपटासाठी परेश यांचं एकूण मानधन १५ कोटी रुपये निश्चित करण्यात आलं होतं. त्यापैकी परेश यांनी त्यांना देण्यात आलेले ११ लाख रुपये हे व्याजासह परत केले. अशातच परेश रावल यांनी आज रविवारी (२५ मे) एक नवीन ट्वीट केले. या ट्वीटवरून हे स्पष्ट होते की, त्यांच्यात आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये अद्याप काही आलबेल नाही.

एका चित्रपटातून बाहेर पडल्या मुळे असे झाल्याचे समजते.

निर्मात्यांना व्याजासह परत केलेल्या ११ लाख रुपयासंबंधीच्या वृत्तांबद्दलच परेश यांनी एक्सवर ट्विट शेअर केलं आहे. परेश यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे, “माझे वकील अमित नाईक यांनी माझ्या चित्रपटातून बाहेर पडण्याबाबत योग्य ते उत्तर पाठवले आहे. एकदा त्यांनी माझे उत्तर वाचले की, सर्व समस्या सुटतील.” दरम्यान, परेश यांनी शेअर केलेल्या ट्विटखाली अनेक चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसंच या संबंधित अनेक प्रश्नही विचारले आहेत.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!