नागपूर बोरी -तुळजापूर चौपदरी महामार्ग गेला,,.या वेगवान महामार्गावर चार चसकी दुचाकी सुसाट वेगाने धावतात पण या वेगात आर्णी नजीक च्या नगरपरिषद हद्दीतील दत्तरामपूर गावातून जाणाऱ्या या महा मार्गाचे अधिग्रहनाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे म्हणून यर्थे काम झाले नाही.फक्त येथेच जुना डांबरी मार्ग आहे.त्यामुळे दोन्ही बाजूमे येणारे वंशन अचानक येथे ब्रेक होतात दुचाकीस्वार तर खड्ड्यात गेल्याने अपघात होतात येथे मार्गावरील खड्डे जीवघेणे बनले आहे
महामार्ग प्राधिकरण ओरड झाली की थातूर मातूर डागडुजी करून मोकळे होते.मात्र पुन्हा काही दिवसात रस्ता जैसे थे होते.
आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी च्या जिल्हा उपाद्यक्षा रंजना आडे यांनी या महा मार्गा वरील असलेल्या खड्डया ची दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तहसीलदार आर्णी यांच्या मार्फत निवेदन दिले.अन हा रस्ता सिमेंट ने करावा डांबरी डागडुजी नको असे म्हटले आहे तसे न झाल्यास तेथे खड्डयात रांगोळी काढून प्रतिकात्मक पुतळ्यास बांगड्या चा आहेर करण्याचा इशारा दिला आहे.