अशोकराव चव्हाण म्हणजे एक भारदस्त नेतृत्व,राजेशाही थाट, काँग्रेस पक्षाने त्यांचे वडील स्व.शंकरराव चव्हाण यांना रस्त्याचे मुख्यमंत्री केले देशाचे गृहमंत्री संरक्षण मंत्री केले अशोकराव चव्हाण यांना महसूल मंत्री मुख्यमंत्री खासदार केले काँग्रेस चे प्रदेशाद्यक्ष केले.(टीप:मी काँग्रेस चा समर्थक नाही)
पण अशोकराव चव्हाण यांना आदर्श घोटाळा भोवला तेव्हा सर्व राज्यात त्यांच्या विरुद्ध संताप निर्माण झाला होता. म्हणून त्यांचा राजीनामा त्या वेळी काँग्रेस पक्षाने घेतला.
ते प्रकरण चीड या आणणारे होते सैन्य दलासाठी उभारलेल्या आदर्श टॉवर मध्ये अशोकराव यांनी पदाचा गैरवापर करत स्वतःच्या मेहुण्याला फ्लॅट दिला
हा मुद्दा प्रचंड गाजला तत्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी आदर्श घोटाळ्या वर रान पेटवले.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड येथे भाजप च्या प्रचार जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श घोटाळा सांगत मड्या च्या टाळू वरचे लोणी खाणारे असे म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांनी याच सभेत अशोकराव लीडर नाहीत तर ते डीलर आहेत अशी टीका करून पेट्रोल पंप गॅस एजन्सी, व्हेकल एजन्सी अशा अनेक एजन्सी काढल्या होत्या.
मात्र विधानपरिषद च्या निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला धोका दिला च सोबत एक आमदार नेला त्याच वेळी समजून चुकले होते की ते भाजप मध्ये जातील.मात्र समजून देखील काँग्रेस ने कारवाई चे धाडस केले नाही,यावरून काँग्रेस ची घाबरट रहाते हे लक्षात येते.अशोकराव चव्हाण यांनी तरुण आमदार राजूरकर यांनाही गळाला लावले सण भाजप वासी झाले. पक्षांतर करणे हा व्यक्तगत निर्णय असतो त्या बद्दल काही कोणाचे मत असू शकत नाही पण भाजप मध्ये प्रवेश घेताच ४८ तासात त्याना भाजप ने राज्यसभेत पाठवले भाजप ने चव्हाण यांच्या सहकार्याची तुरंत परतफेड केली.
मग दिल्लीत पुन्हा भाजप प्रणित सरकार आले पण नांदेड लोकसभा त्यांना जिंकता आली नाही मग दिल्लीत अशोकराव पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यासाठी गेले पण साहेबांनी त्या कडे दुर्लक्ष केले ती व्हिडीओ क्लिप खूप व्हायरल झाली.
आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्या शिवाय दुसरा पर्याय तरी काय निर्णय प्रक्रियेत त्यांना किती स्थान असेल देव जाणो केवळ मुलीला भोकर ची उमेदवारी एव्हढे भेटले तेच खूप झाले. त्यांचा लोकसभेत पराभव केलेले प्रताप पाटील चिखलीकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या सोबत गेले पण अजूनही मनाने नाही तर तनाने गेले अशी चर्चा आहे.
एव्हढे पारायण या साठी की काल परवा नांदेड ला तिरंगा रॅली समारोप सभा झाली अन सगळे विसरून आदर्श असे भाषण अशोकराव यांनी केले शाहिद वीरांना नमन केले ,(शहिदांच्या वाटायचे फ्लॅट यांनी हडप केले त्यांना काय वाटले असेल..?) असो ते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे इतके गुणगान गात होते की मूळ भाजपवासी देखील लाजले असतील.देवा भाऊ देवा भाऊ नावाचा जप एकूण उवस्थितांना काय वाटायचे ते वाटले असेल देवेंद्रजी फडणवीस वयाने लहान असले तरी पदाने ते मोठे आहेत अन कधीही आदर्श ची आठवण करून देऊ शकतात याची चांगलीच जाणीव दमदार खासदार अशोक राव यांना झालेली दिसते.
असो अशोक राव भाजप मध्ये गेले त्याबद्दल दुमत नाही पण काँग्रेस ने अन्याय केला हे राज्यातील शेम्बड्या मुलालाही न पटणारी बाब आहे म्हणून हा प्रपंच…!
प्रमोद कुदळे
संपादक
बोल महाराष्ट्र न्यूस पोर्टल