आयपीएल २०२५ मधील प्ले ऑफ चे सामने रंगतदार होत असून राजस्थान मधील ‘गुलाबी’शहर जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियम वर मुंबई संघाला पराभवाची लाल बत्ती मिळाली आहे.सामना हरताच आता पाच वेळा विजेत्या मुंबई ने तीन नवे गडी विकत घेत त्यांच्या सोबत उर्वरित सामन्यासाठी करार केला आहे मुंबई संघ आशियातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी च्या मालकीचा आहे.त्यामुळे येथे पैसे दुय्यम असून जिकण्याची प्रतिष्ठा मोठी आहे.
विल जॅक्स, रायन रिकलटन आणि कॉर्बिन बॉश यांच्या जागी इंग्लंडचे जॉनी बेअरस्टो, रिचर्ड ग्लीसन आणि श्रीलंकेचे चरिथ असलंका यांना तात्पुरते स्थान दिले आहे. आयपीएलच्या निवेदनानुसार, बेअरस्टोला ५.२५कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आले आहे, तर वेगवान गोलंदाज ग्लीसनला 1 कोटी रुपयांना आणि अस्लंकाला 75 लाख रुपयांना करारबद्ध करण्यात आले आहे.