7k Network

या मुळे संतापले सरपंच मंगेश साबळे…!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलउंबरी तालुक्यातील गेवराई पायगाव येथील युवा आक्रमक सरपंच मंगेश साबळे यांनी काही महिन्यांपूर्वी फुलउंबरी तहसील व पंचायत समिती कार्यालया समोर २ लाख रुपयांचा नोटा उधळल्या होत्या.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व इतर प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी चे बिल काढण्यासाठी व मंजुरी साठी पैशाची मागणी करतात अशी साबळे यांनी तक्रार होती आपण ज्यांचे प्रतिनिधित्व करतो त्या शेतकऱ्यांना जर त्रास होत असेल तर आपल्या पदाचा उपयोग काय ही भावना सरपंच मंगेश यांची होती म्हणून संताप व्यक्त करत नोटा उधळण्याचे कृत्य साबळे यांनी केले.त्या घटनेचा व्हिडीओ राज्यभर प्रचंड व्हायरल झाला होता.आणि मग याची थेट दखल मुख्यमंत्री कार्यालयातून घेण्यात येऊन महिला गटविकास अधिकारी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. जेव्हा आंतरवली सराटी येथे मराठा समाजाचेउपोषण करणाऱ्या महिला वृद्ध व लहान मुलांना पोलिसांनी बेदम मारहाण केली त्यावेळीं सरपंच मंगेश साबळे यांनी आपली नवी कोफी गाडी आग लावून पेटवून दिली होती.हा त्यांचा पोलीस करवाईवरचा संताप होता.
काल मुंबई येथे गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली होती.यावर गुणरत्न सदावर्ते याने कोटी मराठा बांधवांच्या सभेला जत्रा म्हटले.आरक्षण मिळणार नाही असे वक्तव्य करून चिथावणी देतात.मग राग येणार नाही का?आमचे बांधव आत्महत्या करत आहेत.मनोज पाटलांचा आदर असून त्यानी शांततेत उपोषण करावे पण मराठ्यांच्या नादाला लागून डीवचण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर मी सहन करणार नाही असे मंगेश साबळे म्हणाले.मी मनोज पाटलांना देव मानतो आंतरवली सराटी च्या सभेसाठी मी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात समाज बांधवांना घेऊन आलो मी सभेत मनोज पाटलांच्या सोबत स्टेजवर होतो तरीही त्यानी मला ओळखत नाही म्हटले याचे दुःख वाटते.मनोज पाटलांचे आंदोलन कुठेही डायव्हर्ट होणार नाही.निलेश राणे म्हणाले होते की मंगेश साबळे मातोश्रीवर मुक्कामी होते यावर त्यानी हा आरोप चुकीचा असून मी अगोदरच्या रात्री लॉजवर मुक्कामी होतो दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता आम्ही गाडीची तोडफोड केली याचा मला अजिबात पश्चाताप नसल्याचे मंगेश साबळे यांनी एका वृत्त वाहिनीला बोलतांना सांगितले.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!