भारतीय राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांवर चोवीस तास भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम असे कार्यक्रम सुरू असतात.काही समालोचक तर धर्मा धर्मात तेढ निर्माण होईल असे चर्चे चे कार्यक्रम ठेवतात टी आर पी पुढे त्यांना देश महत्वाचा वाटत नाही हे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
काही वर्षांपूर्वी सोशिअल मीडियातून मैत्री झालेली पाकिस्तानी विवाहित तरुणी सीमा हैदर भारतात आपल्या लग्नाच्या पतीला सोडून भारतात आली प्रेमवीर सचिन ला भेटायला नव्हे तर इथे तिने संसार थाटला ती घुसखोरी करून भारतात आली मात्र तिला येथील कायदेशीर नागरिक होण्यासाठी वकील प्रयत्न करत आहेत भारतीय मीडिया दोन महिने सीमा च्या बातम्या दाखवत होत्या हिर रांझा सोनी महिवाल या पेक्षाही भयंकर कव्हरेज देत लव्ह स्टोरी सांगण्यात मीडिया गुंग होती.
आज पहेलगाव मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यात २७ पर्यटक ठार झाले होते यामुळे भारतीय सरकारने कठोर निर्णय घेतला. त्यात एक निर्णय आहे की भारतातील पाकिस्तान च्या नागरिकांनी पुढील ४८ तासात देश सोडण्याचे आदेश दिले त्यावर भारतीय मीडियाला आता सीमा हैदर चे कसे होणार याची काळजी लागली आहे.वास्तविक अनेक संसार उध्वस्त करणाऱ्या कपाळाचे कुंकू पुसणार्या दहशतवादी देशाच्या कुणाचाही सहानुभूती म्हणून विचार करू नये अशी जनभावना व्यक्त होत आहे.