काश्मीर खोऱ्यातील २७ पर्यटक दहशतवादी हल्ला झाला त्यात ठार झाले होते.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबिया चा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले त्यांनी विमानतळावर परराष्ट्र व सुरक्षा सल्लागार वरिष्ठ मंडळी व अधिकारी उपस्थित होते.
त्या नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने कश्मीर गेले तेथे घटनास्थळी पाहणी केली.मृतकांना श्रद्धांजली वाहिली जखमी ची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
काल महत्वाच्या बैठकीत पाकिस्तान ला दिल्या जाणारे पाणी अडविण्यासाठी व सर्व पाकिस्थानी नागरिकांनी पुढील ४८ तासात भारत देश सोडावा तसेच कटारा सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला.
आज पंप्रधानास नरेंद्र मोदी यांनी बिहार येथील जाहीर सभेतून पाक वर संताप व्यक्त करून हा हल्ला आमच्या आत्म्यावर हल्ला असून एक एक आतंकवादी शोधून काढू व त्यांच्या कल्पनेच्या बाहेर शिक्षा देऊ असे सांगितले.आतंकवादी कृत्याला समर्थन देणाऱ्या जमिनीला मुळा सगट नष्ट करण्याची वेळ आली असा थेट इशारा पाक ला दिला.
तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या इशार्या नंतर पाकिस्तान बिथरला असून त्याने अनु चाचणी ची घोषणा केली.
आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली असून गृहमंत्री अमित शहा व परराष्ट्र मंत्री एस जयशंकर देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या भेटीला गेले असून पाकिस्तान ने भारतातील व्यापार बंद केला व वाघा बॉर्डर देखील बंद केली सर्जिकल स्ट्राईक ची भीती पाकिस्तान ला वाटत आहे त्यामुळे पाकिस्तान भारताला भय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पण देश राजकारणाच्या पलीकडे एकजूट असून मोठे काही घडेल असे सांगण्यात येत आहे.