जायकवाडी चे पाणी मराठवड्यास सोडण्याचा उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम राहिल्याने आता मराठवाडास हक्कच पाणी मिळेल अशी अपेक्झह असताना उत्तर महाराष्ट्र विशेषतः नाशिक मधून पाणी सोडण्यास विरोध होत आहे.पण या संदर्भात गोदावरी खोरे विकास महामंडळ च्या वतीने सरकारलाएक अजबच पत्र लिहले असून राज्यात निर्माण झालेली मराठा आरक्षणाचा लढाई व त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते असा दावा केला.
त्यामुळे काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण व मनोज पाटीलजरांगे यांनी सुद्धा या पत्रावर आक्षेप घेतला.मनोज पाटील यांनी तर पत्र लिहणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा असे म्हटले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धरणातील पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत उत्तर महाराष्ट्रातील धरणांतून ‘जायकवाडी’ला ८.५ टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मराठावाड्याच्या बाजूनं लागला असला तरी उत्तर महाराष्ट्रन आता विरोध करायला सुरवात झाली आहे. मराठावाड्यातील लोकप्रतिनिनींनी आजच पाणी सोडावं असा आग्रह धरलाय तर नाशिक मधील लोकप्रतिनिधीनींनी पाण्याचं पुरसर्वेक्षण व्हावं असा पवित्रा घेतलाय.
समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार नाशिक-नगर जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीला ८.५ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिले होते. त्यानंतर जलसंपदा विभागाने नाशिकमधील दारणा, गंगापूर व अन्य धरणातून तर नगरमधील भंडारदरा व मुळा धरणातून पाणी सोडण्याबाबत चाचपणी सुरू केली होती. मात्र, जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात तर नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे तसंच खासदार हेमंत गोडसे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण काल (दि.२१) सुनावणीसाठी ठेवले होते. या प्रकरणावर सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला,त्यानुसार‘जायकवाडी’त ८.५ टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश कायम ठेवले आहेत. सध्या जायकवाडी धरणात ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरण समूहात ७९ ते ८८ टक्के पाणीसाठा आहे.