7k Network

१५ दिवसात होणार वेतनश्रेणी लागू बच्चू कडू यांच्या प्रयत्नांना यश

*बच्चु भाऊ यांच्या प्रयत्नाला आले यश, मुख्यमंत्री महोदय यांनी 15 दिवसात वेतन क्षेणी लागु करू असे दिले आश्वासन*
उमरखेड तालुका प्रतिनिधी,
दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व सर्वसामान्यांचा आधार, माजी मंत्री ,आमदार आदरणीय बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या प्रयत्नामुळे अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्या संबंधी जी शासकीय बैठक आयोजित करण्यात आली. (खरे पाहिली तर ही बैठक राज्यातील अपंगाच्या समस्या विषयी आयोजित करण्यात आली होती केवळ 26 ऑक्टोबर 2023 रोजी संघटनेच्या अमरावती येथील मेळाव्यात ठरल्याप्रमाणे व आदरणीय बच्चुभाऊ यांनी दिलेल्या शब्दामुळे आपला विषय या बैठकीमध्ये घेण्यात आला) या बैठकीमध्ये वसतीगृहाच्या चारही पदांना (अधीक्षक, स्वयंपाकी, चौकीदार, मदतनीस) वेतनश्रेणी लागू करणे संबंधी परिपूर्ण प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर मंत्रिमंडळात बैठकीसमोर ( कॅबिनेट) ठेवण्यात यावा आणि राज्यातील अनुसूचित जातीच्या मुला-मुली करिता चालवल्या जाणाऱ्या आश्रम शाळा त्यांची सलग्न वसतीगृह कर्मचारी व विजाभज च्या आश्रम शाळा व त्यांची सलग्न वसतीगृह कर्मचारी आणि मागासवर्गीय अनुदानित वसतीगृह कर्मचारी यांच्या समान काम समान वेतन या न्याय तत्त्वानुसार वेतनातील फरक दूर करून समानता आणावी यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राज्यातल्या सर्वच्या सर्व विभागातील सचिव, वित्त विभागाचे सचिव व राज्याचे मुख्य सचिव उपस्थित होते. वसतीगृह कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका या बैठकीमध्ये घेतल्यामुळे आदरणीय बच्चू भाऊ कडू साहेब व सामाजिक न्याय विभागाचे सचिव सन्माननीय सुमंत भांगे साहेब यांचा आज महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतीगृह कर्मचारी संघटनेच्या वतीने मंत्रालय मध्ये भेट घेऊन सत्कार करण्यात आला, यावेळी आदरणीय आमदार कवाडे सर, उपसचिव डेंगळे साहेब, माजी सभापती मधुकरभाऊ एकुर्केकर, प्रदेश अध्यक्ष मारुती कांबळे येळीकर, शालिनीताई मयूर मॅडम, जावरकर सर, प्रदीप वाकपैंजण सर, विशाल कदम सर ,कुंनघाडकर भाऊ, चुन्नीलाल पवार सर, झुंजारराव सर, देसले सर सिधेवाड सर नांदेड,विशाल कदम सर, प्रदीप कुमार मयूर सर , तुळशीराम भोवर सर ,प्रीती गोस्वामी मॅडम व वस्तीग्रह पदाधिकारी उपस्थित होते.
आज सत्कार स्वीकारल्यानंतर आपले विभागाचे सचिव सन्माननीय भांगे साहेबांनी आजच परिपूर्ण प्रस्ताव कॅबिनेटसाठी पाठवण्यात येईल असे सर्वात समक्ष ठोस आश्वासन दिले आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!