पैसा मधील आदिवासी बहुल गावात ग्राम सभेची मान्यता व नाहरकत नसताना निमन पैनगंगा प्रकल्पाच्या सर्व्हेक्षण कामासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना धारण विरोधी संघर्ष समिती व ग्रामस्थांनी मज्जाव केला.
ज्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण काम हाती घेतले त्याना जाब विचारला असता वरिष्ठांच्या सूचनेनुसार आपण काम करत असल्याचे त्यांनीं सांगितले.तेव्हा स्पिकर ओंन करून वरीष्ठ अधिकाऱ्यांस फोन करण्यात आला.आणि यावेळी धारण विरोधी संघर्ष समिती चे प्रसिद्धी प्रमुख यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी प्रश्नांचा भडिमार केला. जर पेसातील ग्राम सभेचा ठराव नसला तर काम करता येते का?
ग्रामपंचायत ला सरपंच लोकांना तारीख देऊन गावात ताटकळत ठेवण्यात आले हे योग्य आहे का..?
सरपंच लोकांना तुम्ही रिकामचोट समजता का असे म्हणत आपला संताप व्यक्त केला
तंवर यांनी विचारलेल्या एकही प्रश्नाचे अधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही किंबहुना ते यावेळी निरुत्तर झालेले दिसले.
यापूर्वी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी लोकांचे काय हाल झाले हे विसरू नका..!
पैनगंगे चा श्राप घेऊ नका असा सल्लाही त्यानी दिला सोबत
यापूर्वी अधिकारी लोकांचे के झाले ते पहा या वाक्यातून एकप्रकारे गर्भित ईशाराच दिला.
