राजुरा लहान बृहत लघु सिंचन प्रकल्प गेल्या सात वर्षा पासून उच्च न्यायालयाच्या निकालाच्या कारणस्तव बंद पडला होता. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा होता.व आवश्यक आहे. सदर प्रकल्पाचा आमदार बच्चू कडू यांनी सतत पाठपुराव्यामुळे प्रारंभीक किंमत ४० कोटी वरून आता तब्बल २०० कोटी वाढवून घेतली. तसेच ज्या शेतकऱ्यांची शेती हस्तांतरित व्हायची होती त्यांना वाढीव मोबदला मंजूर करून या प्रकल्पाचे भूमिपूजन केले.
सदर प्रकल्पामुळे अमरावती जिल्ह्य़ातील १००० हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ होईल. या मुळे शेतकऱ्यानी आनंद व्यक्त केला असून कडू याचे आभार मानत शुभेच्छा दिल्या.
