अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्रीराम लाल च्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळा होत आहे.देश बभरातून अयोध्येत लाखो भाविक येथे येणार आहेत त्या निमित्ताने येथे येणाऱ्या भाविकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. जगप्रसिध्द सेफ विषु मनोहर एका कढईत ७ हजार किलोचा शिरा करून तो भक्तांना प्रसाद म्हणून देणार आहेत.
हनुमान कढई १५ हजार लिटर क्षमतेची असून १८०० किलो वजन व १५ फूट व्यासाची आहे. ही कढई तयार करण्यासाठी ६ मी.मी. जाडीचा स्टीलचा पत्रा वापरला गेला असून हा पत्रा धरणाची दारे किंवा जहाज बांधणीसाठी उपयोगात आणला जातो. कढईचा तळभाग लोखंड व तांबे या धातूंपासून तयार करण्यात आला आहे. तो १० फूट आकाराचा आहे. दोन धातूंचे पत्रे एकावर एक तळाशी लावल्यामुळे ते उष्णता शोषून घेतील आणि शिरा जळणार नाही. या कढईत वापरला जाणारा एक सराटा हा २४ इंच रुंदीचा असून ३२ किलो वजनाचा आहे. ही कढई विश्वकर्मा फॅब्रिकेशन वर्क्स, एमआयडीसी, नागपूर येथे नागेंद्र विश्वकर्मा व त्यांचे वडील अनिरूद्ध विश्वकर्मा यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली आहे. ही कढई घडवायला १५ ते २० कारागीराची मदत घेण्यात आली. हे आव्हानात्मक कार्य करायला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागतो. परंतु, विश्वकर्मा पिता-पुत्र आणि कारागीर यांची कौशल्यबुद्धी, मेहनत, रामभक्ती यांच्या जोरावर हे कार्य एक आठवड्यातच पूर्ण झाले आहे.