२३ जानेवारी पासून आर्णी च्या नालांवर स्टेडियम वर स्व.हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक क्रिकेट सामन्याचे आयोजित करण्यात आले असून हे सामने जिल्ह्यातील संघात खेळल्या जाणार आहेत स्पर्धेच्या तयारी साठी स्थानिक क्रिकेट खेळाडू परिश्रम घेत असून यासाठी आर्णीचे लोकनेते माजी आमदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सह संपर्क प्रमुख बाळासाहेब मुनगीणवार यांनी मैदानात जाऊन मैदानाची पाहणी केली व सामन्यांच्या आयोजनाचा तयारीचा आढावा घेतला.संपूर्ण मैदानात पाणी मारून रोलर ने दबाई करण्यात आली असून मैदानावरील खडा न खडा दूर करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.
क्रिकेट खेळासाठी महत्वपुर्ण असणाऱ्या खेळपट्टी(स्पीच)तयार करण्यात येत असून त्याची ही पाहणी मुनगिनवार यांनी केली
जमिनीवर पाय घट्ट असणारे नेतृत्व कसे असते याचा प्रत्यय आवाज आला.
आज मैदानावर बाळासाहे मुंनगीणवार यांच्या सोबत शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख माजी पंचायत समिती सदस्य उत्कृष्ट यष्टीरक्षक उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू रमेश ठाकरे,अस्तपैलू क्रिकेटपटू शेरु सय्यद,राजू बुक्कावार, सुयोग चिंतावार,काल्या शेख,नवाज शहाशुभम वानखेडे,पप्पू मतपालवार,ओम गिरी यांच्यासह अनेक खेळाडू उपस्थित होते.
