राहुल गांधी यांनी भारत जोडो(न्याय) यात्रा मणिपूर वरून तीन दिवसांपासून सुरू असून या यात्रेत वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केले त्यावर आधी वंचित बद्दल इंडिया आघाडीचा समावेश स्पस्ट करा मगच भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पस्ट सांगितले त्यामुळे वंचित च्या इंडिया आघाडीच्या समावेशक बद्दल उत्सुकता वाढली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादी च्या अनेक उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला होता.त्यात सोलापूर मधून काँग्रेस चे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे नांदेड मधून काँग्रेस चे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण या दिग्गजांना हार पत्करावी लागली होती.
तर संभाजी नगर मधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे याना पराभव पत्करावा लागला होता.
संकुले मतांचे विभाजन टाळण्यासाठी वंचित ला साद घातल्या जात असली तरी वंचित बसबत अजूनही अंतिम निर्णय होत नसल्याने वंचित मध्ये सुद्धा अस्वस्थता पहायला मिळत आहे.
