एकतर भाजप मध्ये थेट या किंवा भाजपाला पाठींबा द्या असा प्रकार सुरू असून असे सुरू असून तो दिवस दूर नसेल ज्या दिवशी या देशात मूळ भाजप शिल्लक रहाणार नाही तर काँग्रेस युक्त भाजप होण्यासाठी सुरवात होईल.असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
काँग्रेस चे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे याना काँग्रेस मधून भाजप मध्ये येण्यासाठी ऑफर आहे असे खुद्द शिंदे यांनीच सांगितल्याने एकच खळबळ उडाली होती पण आमच्या रक्तात काँग्रेस आहे असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यान8 काँग्रेस सोडणार नाही असे म्हटले तरी
आगामी काळात राज्याच्या राजकारणात भूकंप होईल असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते.त्या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानाला महत्व आले आहे.
