भारत देशात सर्वत्र राम नामाचा गजर सुरू आहे .आयोदयेला २२ जानेवारीला नव्या मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला ची मूर्ती विराजमान होत आहे.त्या पार्श्वभूमीवर केवळ देशात च नाही तर विदेशातही राम नामाच्या गजरात भाविक भक्त दंग झालेले पहायला मिळत आहेत.
भारतातून विदेशात काम,धंदा,नोकरी निमित्ताने गेलेल्या भारतीयांना राम नामाची ओढ आहे.विदेशात वेगवेगळ्या देशात मराठी माणूस असतो तेथे ते आपले सण,उत्सव साजरे करतात त्यासाठी त्यानी एकत्र येत महाराष्ट्र मंडळाची स्थापनाही केलेली आहे.
आफ्रिका देशातील केनिया (नैरोबी) येथेही महाराष्ट्र मंडळ असून महाराष्ट्र व देशातील सर्वच सण उत्सव या मंडळाकडून एकत्र येत साजरे केले जातात.२२ ला प्रभू श्रीराम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा होत आहे.त्यापूर्वी केनियात नैरोबी येथे महाराष्ट्र मंडळाने राम भक्ती साठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील राहवासी स्वप्नील सुभाषराव कदम व पुनम स्वप्नील कदम याची कन्या कु.कस्तुरी या ७ वर्ष वयाच्या मुलीने कथक्क नृत्य सादर करून राम वंदना दिली आणि प्रेक्षक भाविकांची मने जिंकली
