प्रतिनिधी संदीप ढाकुलकर
जरांगे पाटला सोबत लाखो मराठे मुंबई च्या दिशेने रवाना आर पार ची लढाई:!!
पूर्वी मराठे लढायला जात तर सोबत सहा महिने पुरेल इतकी शिदोरी घेऊन जात होते. पूर्वनियोजन पक्के करायचे. मीठ मिरच्यापासूनचे नियोजन बारकाईने करत. आता आरक्षण लढाईसाठी मुंबईकडे कूच केलेले मराठे त्यांचेच वारस आहेत. वारीत निघालेली वाहने आणि केलेलं नियोजन पाहून थक्क होते. अगदी गरम पाणी लागेल, रात्री माळरानात ईचू काट्यात झोपावे लागेल म्हणून लाईट लागेल. यासाठी ट्रॅक्टरवर सोलर बसवलेले आहेत. गाड्यात पाण्याच्या टाक्या आहेत. गॅस आहे, शेगडी आहे. रगी शाली गोधडी आहेत. आणि याहूनही महत्त्वाचे म्हणजे मनात प्रचंड ऊर्जा आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याची उर्मी आहे.
यातूनच लढेंगे जीतेंगे, हम सब जरांगे ही घोषणा महाराष्ट्रभर घुमते आहे.
