प्रतिनिधी संदीप ढाकुलकर
पौष पौर्णिमेच्या निमित्ताने काळुबाई मंदिराच्या काळुबाई देवीचे मुखवटे मिरवणूक गुरुवार दिनांक 25/ 1 /2024 रोजी शिक्रापूर जातेगाव हद्दीतील सर्व देवाचे दर्शन करून मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली आणि शुक्रवार दिनांक26/1/2024 पौर्णिमेच्या निमित्ताने आरतीचा व महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला त्याप्रसंगी शिक्रापूर ग्रामपंचायत विद्यमान सरपंच रमेश गडदे तसेच माजी उपसरपंच सुभाष खैरे जातेगाव नगरीचे भूषण सदाअण्णा पवार माजी सभापती सुभाष अण्णा उमाप जातेगाव नगरीचे सरपंच गणेश उमाप माजी सरपंच किशोर खळदकर माजी ग्रामपंचायत सदस्य सत्यवान भुजबळ मोहम्मद भाई तांबोळी, जितेंद्र काळोखे काळुबाई प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा मेजर सुभाष यांच्या सर्व मित्र मंडळ यांनी खूप चांगल्या पद्धतीचे नियोजन केले सर्व पै पाहुणे मित्रपरिवार यांचा यथोचित मान सन्मान करण्यात आला यापुढील काळातही अशाच प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येतील असे या मंडळाचे आयोजक सुरेश उमापं यांनी सांगितले विशेष म्हणजे ज्या भक्तांना मांढरदेवी काळुबाई या ठिकाणी जाता येत नाही अशा भक्तांसाठी ह्याआपल्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचे काळुबाई मंदिर ची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व सर्व भक्तांना महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या काळुबाई देवीच्या उत्साहाची सांगता करण्यात आली
