आगामी लोकसभा २०२४ विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आज लातूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची मराठवाडा विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रदेश कमिटीचे प्रभारी श्री.रमेश चेंनिथलाजी यांच्या अध्यक्षेखालील ही बैठक पार पडली. यावेळी या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सहप्रभारी आशिषजी दुवा, संपतजी कुमार, आदिवासी काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड शिवाजीराव मोघे साहेब, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हांडोरे, आमदार अमर राजूरकर, आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते…
