आर्णी तालुक्यातील सावळी-पळशी जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच आर्णी भारतीय जनता पक्षाचे माजी आर्णी तालुका संपर्क प्रमुख प्रकाश राठोड यांची यवतमाळ जिल्हा भाजप च्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली
पक्ष संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी एका पत्रा द्वारे प्रकाश राठोड याची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
गेली २५-३० वर्षा पासून सावळी सारख्या दुर्गम भागात प्रकाश राठोड यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्या साठी परिश्रम घेतले असून
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर याचे कट्टर समर्थक असलेल्या प्रकाश राठोड याची सहकार क्षेत्रात देखील चांगली पकड आहे.
या नियुक्ती मुले सर्व स्तरातून प्रकाश राठोड याचं अभिनंदन होत आहे.
