चुलीत गेलं राजकारण असे म्हणण्याची वेळ महाराष्ट राज्याच्या राजकारणात आली आहे.आज बारामतीत नमो महा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला या निमित्ताने संसदेच्या वरिष्ठ सभागृह राज्य सभेचे सदस्य खा.शरद पवार यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्यात आल्याचा प्रकार घडला होता.
बारामती हे शरद पवार याच निवासी गाव येथे त्यांचं गोविंद बॅग नाचाच निवासस्थान आहे.आजवर गोविंद बागेत अनेक दिगग्ज नेते येऊन गेले.बारामतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत म्हणून शरद पवार यांनी त्यांना भोजनाचे निमंत्रण देऊन अतिथी देवो भव चा परिचय दिला मात्र एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी या अमंत्रणास वेळेच्या अभावामुळे नकार दिला.
जेव्हा व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री लोढा याची खा.सुप्रिया सुळे यांनी विचारपूस केली मात्र भाऊ उपमुख्यमंत्री अजित पवार व वहिनी सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहणेही टाळले.यावरून राजकारण कुठल्या पातळीवर चालले हे लक्षात येते.नात्यात दुरावा करणारे राजकारणाची राज्यात मुहुर्तमेढ झाली असेच म्हणावे लागेल.