यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात जे वातावरण आहे त्यावरून येथून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुखच विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.खांदा आमच्यातला पण बंदूक अन गोळी भाजप ची आणि निशाणा मात्र शरद पवार असा आरोप रोहित पवार यांनी केला.बारामतीत त्याना जे हवे होते ते झाले.नेते जरी सोडून गेले तरी कार्यकर्ते मात्र पवार साहेबांच्या सोबत आहेत असेही रोहित पवार म्हणाले.
संजय देशमुख यांनी शिवसेना उबाठा कडून लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यासाठी रोहित पवार यवतमाळ येथे आले होते त्यावेळी ते बोलत होते.