आज आर्णी पंचायत समिती च्या सभागृहात आर्णी वणी चंद्रपूर च्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विविध विभागाच्या कामांचा आढावा बैठक घेतली या बैठकीत आर्णी पंचायत समितीचे माजी सभापती व आर्णी नगरपरिषद चे माजी उपाध्यक्ष राजू भाऊ विरखडे यांनी उमरी पठार येथील पाणीटंचाई चा मुद्दा उपस्थित करून जलजीवन च्या अधिकाऱ्यास चांगलेच धारेवर धरले यावेळी ते चांगलेच संतापले उमरी पठार हे माळरानावर असलेले गाव असून येथे सेवाभावी संत डोला महाराज वृद्धाश्रम असून येथील पाणी टंचाई कायमस्वरूपी मितटवावी व तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
