प्रमोद कुदळे (यवतमाळ):
गावागावात गेल्यावर मी कोणत्या पक्षाचा उमेदवार आहो हे न पहाता ठिकठिकाणी ढोल तासे वाजवत माझे स्वागत होत आहे ही आता परिवर्तनाची नांदी असून आपण मला विजयी करावे मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.यवतमाळ वाशिम जिल्ह्यात विकासाची गंगा अनेक आता पुढे विरोधात बाई किंवा बुवा उमेदवार उभा राहू द्या तुम्ही माझ्या सोबत आहात त्यामुळे आपला विजय निश्चित आहे असे म्हणत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजय देशमुख यांनी मशाल चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.
आज पोस्टल ग्राउंड वर झालेल्या सभे साठी शिवसेना उबाठा युवा सेनेचे प्रमुख माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार माजी मंत्री काँग्रेस चे जेष्ठ नेते आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी राव मोघे,काँग्रेसचे नेते माजी काँग्रेस प्रदेशादयक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वसंतराव पुरके,माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार,माजी आमदार विश्वास नांदेकर,उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, उपजिल्हाप्रमुख प्रवीण पांडे गजानन डोमाळे,किशोर इंगळे राष्ट्रवादीचे प्रवीण देशमुख उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख रवी राठोड,यांच्या सह तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने मतदान नागरिक उपस्थित होते. संचलन यवतमाळ वाशिम लोकसभा प्रभारी व उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी केले