*अखेर रेती तस्कर सोहेल निर्बानला आर्णी पोलिसांनी ठोकल्या बेड्या*
*न्यायालयाने दिला तीन दिवसाचा पोलिस कस्टडी रिमांड*
आर्णी:- तालुक्यातील साकुर भोसा येथिल पैनगंगा नदीपात्रात दिनांक २८/०३/०२४ रोजी गोळीबार व वाहनाची मोठ्याप्रमाणात तोडफोड केल्यांची गंभिर घटणा घडली होती यात आर्णी पोलिस स्टेशन मधे अपराध क्रंमाक ३१४/२०२४ कलम १४३,१४४,१४५,१४६,१४७,१४८,१४९,३४१,३२४,३०७,४२७,
५०४,५०६ भा द वि सहकलम ३,७,२५,२७ आर्म अक्ट नुसार सहकलम १३५ म पो का अन्वये दाखल करण्यात आला होता यातील काही आरोपींना काही दिवसातच अटक सुध्दा झाली होती यातील पुसद येथिल एक आरोपी सोहेल शब्बीर निरबान हा गेल्या सहा महीण्यापासुन फरार झाला होता त्यातच तो पुसद येथे असल्याची गोपीनिय टिप आर्णी पोलिसाच्या गोपणीय शाखेला मिळाल्याने त्याला २५/०९/२०२४ रोजी त्याच्या माघावर असलेल्या आर्णी पोलिसांनी मध्यरात्री त्याच पुसद येथे पकडण्यात यश आले व त्याला २६/०९/ २०२३ रोजी त्याला आर्णी येथिल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन दिवसाचा पोलिस कस्टडी रिमांड मंजुर केला आहे आरोपीला पुढील तपास आर्णी पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार नितिन वास्टर,मनोज चव्हाण ऋषीकेश ईगळे,नफिज शेख,चालक सचिन पिसे यांनी कामगीरी करुन अधिकचा तपास आर्णी पोलिस करीत आहे