अहिल्यादेवी नगर (अहमदनगर) च्या एका चालकाने आर्णीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्रकार घडल्याने तर्क वितर्क लावल्या जात आहे. आर्णी- यवतमाळ महामार्गावर येरमे याचा पेट्रोल पंप आहे.या ठिकाणी कुठल्याही पेट्रोल पंपा वर सुरक्षेसाठी चालक आपली वाहने लावून रात्री च्या वेळी विश्रांती घेतात. असेच टाटा ११०९ ही ६ चाकी गाडी लावून (एम एच १६ ए इ ५१ ९७) चा चालक नामे विश्वनाथ नामदेव गिरी वय ४७ वर्ष, रा.बुटे टाकळी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यादेवी नगर याने पेयरॉल पंपा माघील बाजूला असलेल्या एका झुडुपाच्या बाजूला पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही आत्महत्या त्याने का केली याबाबत माहिती मिळू शकली नाही.परंतु आर्णी पोलिसांनी माहिती मिळताच शरद एडतकर, आकाश गावंडे यांनी मृतदेह शव विच्छेदनास शवविच्छेदन गृहात नेला.पुढील तपास ठाणेदार केशवराव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्णी पोलीस करत आहेत पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यू ची नोंद घेतली आहे.
