राज्यात दरड कोसळून एका गावावर नैसर्गिक संकट आले तेव्हा मुख्यमंत्री असलेले आमचे नेते एकनाथ शिंदे हे माळ रानातून चिखल तुडवत त्या गावात जाऊन त्यांच्या पाठीशी खंबीर राहिले जखमींना उपचार मिळवून दिले.
राज्यातील माता भगिनी ला आधार देता यावा म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून राज्यातील लाडक्या बहिणीचा आधार बनलेले नेतृत्व लाडका भाऊ म्हणजे उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे. असे प्रतिपादन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी केले.
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर थेट मदतीसाठी सरसावलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून राज्यातील शिवसैनिकांचे लाडके नेतृत्व आहेत असेही ना.संजय भाऊ राठोड म्हणाले.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्यातील अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब स्वतः श्रीनगर येथे पोहोचले.
तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळ असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली.
याठिकाणी अडकलेल्या काही पर्यटकांनी उपमुख्यमंत्री महोदयांशी फोनवरून संवाद साधून मदतीची मागणी केली होती. यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी खासदार मा.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेबांचे स्वीय सहाय्यक मा.अभिजीत दरेकर आणि उपजिल्हाप्रमुख मा.राजेश कदम यांच्यासह शिवसेनेच्या मदत पथकाला याठिकाणी अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या मदतीसाठी पाठवले.
या मदतकार्याला वेग येण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी श्रीनगर येथे पोहोचून पर्यटकांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून सुखरूप आपल्याला लवकर घरी नेण्यात येईल. त्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आल्याचे सांगत या सर्वांना मदतीचा आधार दिला. तर शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्यासाठी आपल्या हक्काचा माणूस मदतीला धावून आल्याची भावना यावेळी पर्यटकांनी व्यक्त करत साहेबांचे मनापासून आभार मानले.