भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेचा २०२५ चा निकाल प्रेरणादायी व सुवर्ण अक्षरांनी इतिहासात लिहला जावा असा आहे.कुठे रिक्षा चालकाची मुलगी आय ए एस झाली तर मजुरी करणाऱ्या एका सामान्य माणसाच्या मुलाने आय ए एस ला गवसणी घातली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एका मेंढपाळ कुटुंबातील मुलगा आय पी एस अधिकारी झाला. जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा हा बिरुदेव मेंढया सांभाळत होता चारत होता.
कोणाचे नशीब केव्हा कोणत्या वळणावर जाईल सांगता येत नाही
फोन हरवला म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला गेलेल्या या सर्वसामान्य धनगर समाजातील मुलाची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. आता तोच मुलगा UPSC परीक्षा पास होऊन IPS अधिकारी बनला आहे.
ही कोणत्या चित्रपटाची कथा नव्हे तर वास्तव्य आहे. कोल्हापुर जिल्हातील कागल तालुक्यातील श्री.बिरदेव डोणे यांच्या यशाबद्दल जेवढ कौतुक करावं तेवढं कमीच आहे. बिरदेव जी पुन्हा एकदा आपले अभिनंदन. बिरदेवचे उदाहरण हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत ठरणार आहे. आपल्या हातून समाजाच्या प्रति आदर आणि सेवा घडत राहो हीच बोल महाराष्ट्र च्या वतीने शुभेच्छा…