7k Network

मनरेगातून आर्णी तालुक्याला दिल्या २००० सिंचन विहिरी…!

प्रमोद कुदळे

आर्णी तालुक्यातील मनरेगा महात्मा गांधी रोजगार हमी कायदा अंतर्गत झालेल्या कामांची तक्रार झाल्याने हा तालुका चर्चेत आला होता.

 थेट मंत्रालया पर्यंत हे प्रकरण नेण्यात आले होते त्यामुळे गेली ३ वर्ष तालुक्यातील गावात मनरेगा योजनेतून सार्वजनिक विकास कामास मंजुरी देण्यात आली नाही

प्रसिद्धी माध्यमातून देखील मनरेगात ३०० कोटींचा घोटाळा गाजला होता.मनरेगा जणू माध्यमाचे लक्ष व भक्ष्य बनले होते.

मात्र मनरेगात काही वयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्यात वयक्तिक सिंचन विहीर,गाय म्हशी गोठा यांचा समावेश होता काही रक्कम घरकुल योजनेत देण्यात येत होता. तक्रारी च्या पार्श्वभूमीवर नव्या कामांना मंजुरी देणे बंद झाले असतांना आर्णी येथे गटविकास अधिकारी म्हणून प्रभार स्वीकारलेले रमेश खारोडे यांनी आर्णी तालुक्यातील तब्बल २००० सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला.हे काम मोठे साहसाचे  होते पण शेतकऱ्यां विषयी कळवळा असलेल्या गटविकास अधिकारी खारोडे यांनी मात्र शेतकऱ्यांना कुठलाही त्रास न होऊ देता वयक्तिक सिंचन विहिरीस मंजुरी दिली.५००००० रुपये किंमत असलेल्या विहिरी साठी शेतकऱ्यांनी कोणालाही पैसे देऊ नये असा कटाक्ष त्यांनी घेत खबरदारी घेतली.

२००० विहिरीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यातील
११६१ विहिरींचे काम सुरू आहे.तर विहीर पूर्ण होऊन पाणी लागलेल्या विहिरींमुळे शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.एक पीक घेणारे शेतकरी आता दोन तीन पिके घेत आहेत.

तालुक्यातील भाजीपाला लागवडीत वाढ

पूर्वी आर्णी येथे भाजी बाजारात शेजारील तालुक्यातून भाजीपाला येत होता आता तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केल्याने मुबलक प्रमाणावर बाजारात भाजीपाला उपलब्ध होत आहे.सोबत काही शेतकऱ्यांनी फळ लागवडी कडेही आपले लक्ष केंद्रित केले आहे.

शेतकऱ्यांना वयक्तिक सिंचन विहिरी चा लाभ देण्यात गटविकास अधिकारी रमेश खारोडे  अमीर खान सहायक कार्यक्रम अधिकारी
तांत्रिक सहायक मनोज इंगळे (ऑपरेटर)आर्णी पंचायत समिती यांनी परिश्रम घेतले.

 

विहिरी चे अनुदान थकले….

विहीर मंजूर झाल्याने शेतकऱ्यांनी सिंचन विहीर खोदून बांधकाम देखील केले.मात्र त्यांना शासकीय मोबदला मिळाला नाही त्यामुळे शेतकरी संकटात आहे. किमान शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचे अनुदान सरकारने द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत तर स्थानिक लोकप्रतिनिधी नी यात लक्ष घालावे असेही शेतकरी बोलत आहेत.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!