आय पी एल च्या मोसमात जवळपास सर्व संघाचे पहिल्या साखळीतील सामने खेळून झाले असून आताची स्थिती पहाता काल चेन्नई सुपर किंग या धोनी च्या संघा सोबत विराट कोहली च्या बंगरुळू संघ अटीतटी च्या सामन्यात विजयी झाला.
या सामन्यात विराट ने अर्धशतक देखील झळकावले या आय पी एल २०२५ मध्ये विराटने आपल्या संघाच्या विजयात सिंहाचा वाटा आहे.
बंगरुळू संघाने आजवर खेळलेल्या एकूण १० सामन्यात ७ विजय मिळवत १४ गुण मिळवले आहे
हा संघ आज जरी गुंतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असला तरी गुंतालिकेत अंतिम चार संघात स्थान मिळवण्यासाठी पाहिलेले विराट चे स्वप्न भंगनार की काय अशी अवस्था आहे.
लीग स्टेज ला आता ७ संघ असून ते १६ पेक्षा जास्त गुण मिळवू शकतात तर ५ संघ असे आहेत की ज्यांचे गुण २० होऊ शकतात.
ज्या संघाला २० गुण मिळतील ते संघ अंतिम चार मध्ये पोहचतील आणि मग नेट रण रेट वरून अंतिम चार संघाची निवड होईल.त्यामुळे १६ गुण मिळवले तरी विराट चे स्वप्न पूर्ण होईल की बंगरुळू संघ बाहेर होईल हे पहावे लागणार आहे.