आर्णी तालुका काँग्रेस कमिटीची संवाद बैठक संपन्न.
आर्णी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार आर्णी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संवाद बैठक स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आली. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर व य.जि.म.बँकेचे अध्यक्ष मनीष उत्तमराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. सर्वप्रथम पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मौन ठेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. टोकाच्या विरोधाला न जुमानत, सातत्यपूर्ण व अथक परिश्रमाने केंद्र सरकारला जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करण्यास भाग पाडल्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला. यावर्षी अपेक्षित असलेल्या नगर परिषद,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने तालुक्याचा सखोल आढावा जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर यांनी घेतला. उपस्थितांनी या चर्चेत आपापली मते नोंदविली. बूथस्तरावर पक्ष बांधणी करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याबाबत नियोजन करण्यात आले. शनिवार १० मे ला यवतमाळ येथे होणाऱ्या पक्षाच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील भारती, माजी नगराध्यक्ष आरीज बेग मिर्झा, राजु विरखड़े (माजी सभापति प.स.),छोटूभाऊ देशमुख, एड. प्रदीप वानखडे, विजय मोघे,शहराध्यक्ष अमोल मांगुळकर, उमेश कोठारी (संचालक, कृ.उ.बा.स.) नरेश राठोड़, राजु गावंडे, खुशाल ठाकरे, गिरिधर कुबड़े, संजय ठाकरे, रोहिदास राठोड़, दिलिप चव्हाण, मकबुल शहा, बाळासाहेब गिरी, जाफर पेंटर काका, देवा राठोड़, संदीप उपाध्ये, पिंटू चौधरी, रवी नाटकर, दीपक देवतले, दत्ता माकोड़े, मनोहर फेंडर, उमेश आचमवार,विष्णु इंगोले, नीलेश चव्हाण, अमित पवार, कुणाल भगत उपस्थित होते.
