राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे करून शिवसेने पाठोपाठ बंड करत भारतीय जनता पक्षाच्याया नेतृत्वाखाली असलेल्या महा युतीत अजित पवार सहभागी झाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ मध्ये उपमुख्यमंत्री व अनेक महत्वाची खाती अजित पवार दादांनी पदरात पाडून घेतली.पक्षाचे नाव व चिन्ह मिळवले.आता सर्वोच्च न्यायालयात या विषयावर सुनावणी असून त्यापूर्वी खा.शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असे संकेत दिले असून
याविषयी बोलताना शिवसेना उबाठा नेते खासदार संजय राऊत यांनी मिश्कील भाष्य केले असून ते पूर्वी पासून एक होते असे म्हटले असून सत्तेशिवाय न राहू शकणारे तिकडे व आमच्याकडे देखील आहेत असेही ते म्हणाले.