पहलगाम हल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबविले.हवाई हल्ल्यात दहशतवादी तळ उद्धस्त केले अजूनही सैन्य कारवाई सुरू आहे युद्ध जन्य परिस्थिती पहाता सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या त्यात लग्नाला सुट्टी घेऊन आलेल्या एका सैनिकांच्या अंगावरील हळद देखील सुकली नसतांना देश प्रथम म्हणत त्या नवरदेवाने नवरी चा निरोप घेत सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला
ही खरी देशभक्त सैनिकांची ओळख असे म्हणत या सैनिकास अनेकांनी शुभेच्छा दिल्या व यशस्वी भव अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
– पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली… अवघ्या ५-७ दिवसापूर्वी लग्न झालेल्या जवान पत्नीचं कपाळ पांढरं झालं.. देश शोकसागरात बुडाला.. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या संबंधांचा तणाव वाढला…
गेल्या दोन-तीन दिवसापासून भारताकडून या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे काम देशाचं संरक्षण खातं करत आहे…
याच पार्श्वभूमीवर देशभरातील जवानांच्या सुट्ट्या रद्द करून तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत….
अर्थात, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक जवानांनी हात पिवळे केले… यामध्ये जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील या जवानाचं देखील ५ मे रोजी लग्न झालं. म्हणजे लग्नाला आज अवघे ४ दिवस झालेत… नवरा-नवरी यांच्या अंगावरची हळद अजूनही ओली आहे… दोघांच्या हातावर नटलेली मेहंदी अजूनही रंग भरीत आहे… मात्र सीमेवरचा वाढता तणाव पाहता आर्मी मॅन मनोज यांना ८ तारखेला देशसेवेसाठी तात्काळ हजर राहण्याचा कॉल आला…
लग्नाच्या सुखाचा असंख्य स्वप्नांवर पाणी सोडून माझ्या भारतातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षण झालं पाहिजे हा विचार घेऊन मनोज पाटील तात्काळ ऑन ड्युटीवर हजर राहण्यासाठी रवाना झालेत.
सॅनिकास रेल्वे स्थानकावर निरोप देतांना जे दृश्य पहावयास मिळाले हे नक्कीच हृदयाला चटका देणारं ठरले… एका डोळ्यातून देशसेवेसाठी जाणारा ‘पती’ बद्दल अभिमान आणि दुसऱ्या डोळ्यात तीन दिवसापूर्वी झालेल्या पतीबद्दल अश्रू पहावयास मिळाले… “ऑपरेशन सिंदूर” साठी नवविवाहितेचं “कुंकू” आज ओल्या “हळदी” ने रवाना झालंय…!
अशा ह्या शूर सैनिकांस नमन…त्या ताईला सलाम लवकरच तुमचे विर पती यशस्वी होऊन परत येतील यासाठी ईश्वराच्या चरणी प्रार्थना…!
बोल महाराष्ट्र